*जीव वाचला नाही तरी चालेल पण नोकरी टिकली पाहिजे... किती ही लाचारी....*
.... भरपूर सुट्ट्या आणि भरघोस पगार म्हणून हिणवणाऱ्या शिक्षकांना खरंच कोणी वाली नाही....
.... आज करोना च्या संकटात सगळे आपला जीव मुठीत घेऊन आपापल्या घरट्यात सुखरूप बसले आहेत.... पण शिक्षक मात्र खूप सुट्ट्या खातो... पगार खातो..... त्यामुळे त्याला अमरत्व प्राप्त झालेले आहे.... तो मात्र जातो लोकांच्या दारात सर्वेक्षण करायला.... त्याला मुलं बाळ नसतात... त्याला काही आजार नसतात आणि मुख्य म्हणजे तो शिक्षक असल्यामुळे सर्वज्ञ असतो.... त्याला ते काम करण्यासाठी कोणत्याच प्रशिक्षणाची गरज नसते..... आपल्या आजूबाजूला कोविड-१९ चा एखादा रुग्ण मिळाला तरी सामान्य माणसाच्या घशाला कोरड पडते..... लोकांना कल्पनाही नसेल पण अशाच रुग्ण मिळालेल्या वस्तीत शिक्षकांना सर्वेक्षणासाठी पाठवलं जातं..... बरं काही विशेष सोई... तर अजिबात नाही.... मागितले तर मास्क आणि ग्लोव्हज मिळतात.... नाहीतर ते ही घ्या म्हणून कोणी सांगत नाही.... बरं तिकडचे वैद्यकीय अधिकारी अशा शब्दात बोलतात की शिक्षक रस्त्यावरचे रिकामटे आहेत... आणि हे त्यांना कामाला लावत आहेत.... त्यांचे वय, त्यांचा शाळेतील सेवेचा अनुभव, त्यांचे विषयाचे ज्ञान या सर्व बाबी तेथे शुल्लक ठरतात... शिक्षकाला गरीब का म्हणतात याचा प्रत्यय येथे पदोपदी येतो....कधी संपणार ही फरफट देवाला माहित.... आपत्कालीन परिस्थितीत सरकारच्या आदेशांचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.... पण केवळ शिक्षक हाच समाजाचा एकमेव घटक आहे का..... समाजातील इतर घटक हे केवळ सोई सुविधांचा लाभ घेण्यासाठीच आहेत का..... बरं डॉक्टरांनी केलेल्या कार्याचा गौरव होतो.... पोलिसांची काळजी केली जाते पण शिक्षकांना मात्र उपहासच मिळतो असं का....देश सेवा केवळ सीमेवर लढूनच केली जाते असं नाही... ऑर्डर आली की धावणारा प्रत्येक शिक्षक देशाची सेवा करत असतो.... त्याचा मानसन्मान नका करू, गौरव नका करू, पण किमान उपहास तरी करू नका..... घरी बसून फुकट पगार घेतात असं तरी नका म्हणू.... त्या सेवकांचा मान ठेवा.... ते काही आरोग्य कर्मचारी नाहीत तो त्यांचा पेशा नाही ती त्यांची आवड नाही.....जीव मुठीत घेऊन ड्युटी करणं म्हणजे काय हे त्यांच्या पेक्षाअधिक चांगलं कोण सांगेल....
No comments:
Post a Comment